मैत्री म्हणजे नेमके काय ? प्रत्येकाचे मत वेगळे असेल , माझ्या मते
आधी ओळख ,मग विश्वास .... आपल्या चांगल्या -वाईट प्रसंगाला समजून घेईल असा
, स्वतः चे आनंद-दुख आपल्याला सांगेल असा ..... असा विश्वास असला कि
मैत्री झाली ...मग नेहमी हाय ,हेल्लो म्हणायची पण गरज लागत नाही
.मित्र/मैत्रीण फार काळ आपल्याशी बोलले नाहीत म्हणजे मैत्री संपते का ? तर
तसे नंसते खर्या मैत्रीत समजुतदारपणा असतो , जर कधी एकाचे चुकले ...तर
दुसर्याने समजून सांगण्याचा अधिकार असतो ,आणि दुसर्याने ते समजून घेण्याचा
भाग असतो ...इथे माफी किंवा धन्यवाद अशा वरवरच्या शब्दांना थारा
नसतो...मैत्रीमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात ,पण ते इतर ठिकाणी गोस्सीप चे
विषय म्हणून बोलले जावू नये हि सामान्य अपेक्षा असते.. मैत्री करताना मी
विचारपूर्वक करत नाही , पण मैत्री तोडताना कोणी हि गैरसमजातून तुटू नये हि
अपेक्षा आहे... आपल्याला काय वाटते ?
अर्चना २०/२/२०१२
अर्चना २०/२/२०१२
No comments:
Post a Comment