आमच्या वसाहतीत काल संध्याकाळ चा सुदृढ बालक स्पर्धा (वयोगट १ ते ३
वर्षे ) आयोजित केली होती . मी नेहमीप्रमाणे भाजी घ्यायला खाली उतरले तर
सगळी छोटी मुले आई सोबत उभी ....त्यांची तेव्हा धावण्याची स्पर्धा सुरु
होत होती .. ८-१० बालके धावण्याकरिता उभी त्यांच्या मागे आई (आया ) असे
धाव, तिकडे पोच ,पहिला तू च आला पाहिजेस ... आता मुलांचे वय दीड ते अडीच
असावे पण प्रत्येक आई हेच सांगत होती ,बाळांना किती समजत होते माहित नाही
.
शिट्टी वाजली मग आई तर काय एकदम ओरडायला च सुरुवात अरे राजू धाव अग राणी नीट पळ, आणि बाजूने त्याही धावू लागल्या .....
एका बाजूने बाबा ज कॅमेरे घेवून धावत आहेत ......
आहा आणि आमचा बाळू बसला कि धपकन खालीच ... मग आई चा वैताग... अरे पळ न! .... नाही........ मी नाही ....आणि भोकाड सुरु!
...राणी ने सुरुवात तर चांगली केली ,पण बाजू ने आई पण धावते पाहिल्यावर आली धावत आई कडे , आता झाली न पंचाईत !
सगळे पळत आहेत हे पाहून सनी ने केली सुरुवात दुडूदुडू रांगायला च .....
तिथे राजू ,मनी ,सोनी,पिंकी धावत होते , आणि एकदाचा राजू पोचला पहिल्या नंबर वर ..... आणि गप्पकन आई च्या हातातील केक खाल्ला...... मग सगळ्यांना समजले कि राजू इतके भरभर कसा धावला? त्याचे बाबा एका बाजूला उभे होते आणि आई दुसर्या बाजूला हातात केक घेवून उभी !
झाले चिडलीच कि मग पिंकीची आई ...तुम्ही चीटिंग केलीत मिसेस .......... ! असे नाही करायचे ....दोघींचे जुंपले ...
माझ्या मागून बाळू चे आई -बाबा येत होते.... बाळू ची आई बाबांवर चिडली होती ..आहे न अगदी तुमच्यासारखा ...जरा जागचा हलला नाही...गेले न बक्षीस ?
राणीच्या आई ने तर राणीच्या पाठीत च धपाटाच घातला .... एरवी मी हाक मारते तर तू पी.टी.उषापेक्षा जास्ती जोराने दुसरीकडे पळतेस आणि आज काय झाले ?
आमच्या घरचे त्यात कोणी नव्हते म्हणून मी थांबले नाही ...
पण माझ्या मनात काही प्रश्न आले ,तुम्हाला पण काय वाटते ते सांगा ..१. सुदृढ बालक स्पर्धेत पळण्याची शर्यत का आली ?
२. सुदृढ बालक ठीक आहे पण पालकांची मने सुदृढ आहेत का ?
३. आयुष्यातल्या पहिल्या -वहिल्या स्पर्धेत हरल्यानंतर आई च्या हात चा धपाटा खाल्लेली राणी स्पर्धा हि स्पर्धा असते त्यात हार-जीत आहे च असा विकॅह्र करू शकेल का ?
४. ह्या स्पर्धेत मुलाचा नंबर आला नाही म्हणून पालकांनी (विशेष तः आई ने ) आपला पराजय असे मानणे योग्य आहे का ?
मुलांना मुल म्हणून जगू न देणे अगदी दीड वर्षापसून योग्य आहे का ?.......

No comments:
Post a Comment