Tuesday, 25 August 2020

माहेरवाशीण.... गौराई

 माहेरवाशीण... पाहुणी 


घर सगळे झाडून केले साफ 

पावलं रेखली रांगोळीने छान !

रांगोळीच्या पावलात कुंकू न हळद, 

उंबरठा धुवून वाहिले कुंकू लाल!

त्यावर ठेविले तांदळाचे माप 

 आज माहेरवाशीण येईल  दारात !

दूध पाण्याने तिची नजर उतारू 

प्रेमाने तिला साखर  भरवू !

चंदनाची पावलं घरात रेखायची, 


त्यावर मिरवत पाहुणी यायची !


 औक्षणाने जागेवर बसवायची 

नवीन साडी चोळी नेसवायची !


सोन्या मोत्याने  सजवायची 

लाडू, करंजीने पोट भरायची !


 वर्षातून एकदा लेक घेरी आली 

तिच्या पावली लक्ष्मी आली !


हसून स्वागताला उभ रहा 

 कंबर कसून सरबराई करा!


जेवायला करा गोडधोड पाच 

एकवीस भाज्या अन वड्या पाच !


चटणी कोशिंबीरीने सजवावी डावी  बाजू 

पुरणपोळी, साजूक तुपाने व्हावी  सुरुवात !


आग्रहाने खाऊ घालावे लेकीस 

सावकाश जेवू दे एक एक घास !


पाहुणी अशी इथे रमून जायी 

परि आपल्या घराची ओढ तिज राही !


दोन रात्री चा असे तिचा सहवास 

मग जाईल परत आपल्या घरास !


कौतुक पाहून होई तिज संतोष 

सुख समृद्धी चा देईल आशिष !


निघताना तिची पावले जड  

आपलेही  अंतःकरण जड !


पाहुणी माझी गौराई 

होऊ कशी तुझी उतराई !


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


अर्चना कुलकर्णी.

25/08/2020

No comments:

Post a Comment