असेच मनातले काही :
गुरूपौर्णिमा
आई तूच प्रथम गुरु, तुला कसे मी विसरू?
पण तीन वर्षापूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आम्हाला पोरके करून गेलीस !
तू च बोलायला शिकवलेस ,बोट धरून चालायला शिकवलेस, योग्य खायला दिलेस. जसं जसेमोठे होत होतो तेव्हा चान्गले वाईट काय कसे ओळखावे हे शिकवलंस पण काही गोष्टी तुझ्या वागण्यातून शिकवत गेलीस. तुझे नर्सिंग चे शिक्षण झाले होते त्यामुळे सेवा भाव अंगात मुरलेला होता. कोणी आजारी झाले तरी चलबिचल न होता औषधाबरोबर धीर देण्याचे काम करायची. कधी त्यामुळे भीती वाटत नसे. हाडाची शिक्षिका तू होतीस च, जरी नोकरी केली नाहीस तरी मुलांच्या अभ्यासाची पूर्ण जबाबदारी तू आनंदाने पार पाडली. समाजसुधारणा करायला घराबाहेर पडली नाहीस कधी, पण सुरुवात घरापासून केलीस. घरी येणाऱ्या कामवालीला तिच्या मुलांना शिकव असे सांगून थांबली नाहीस, त्यांना दुपारी घरी बोलावून शिकवायला सुरु केलेस. दारावर येणारा पोस्टमन असो की फळविक्रेता भय्या, तुझ्याकडे हक्काने पाणी मागत. तू ही कधी कोणताही भेदभाव केलाच नाहीस. जेवण बनवणे ही तुझी आवड होती, विविध प्रांतातील पदार्थ आम्ही लहानपणीच खाल्ले होते. कलाकुसरीच्या वस्तू, कचऱ्यातून कला तुझे छंद. त्यामुळे नकळत चांगल्या वस्तू बघणे शिकत गेलो. देवावर तुझी अपार श्रद्धा !पण त्याचे अवडंबर कधी माजवले नाहीस. स्वतः उपास करायचिस पण मुलांना लादले नाहीत. देवाचे नामस्मरण करायला सर्व आटोपल्यावर रात्री. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुला शतशः नमन !🙏
दुसरे गुरु तात, आप्पा होय. आप्पानी तर कधी मुला मुलीत भेदभाव केला नाही. अभ्यासात विशेष लक्ष देत. जे शिकायचे ते शिकायला परवानगी दिली, मदत केली. पुस्तकं वाचणे, लिखाण, नाटक बघणे ह्या सर्व गोष्टींची गोडी लावली. नाट्यगीत ऐकणे त्यांची आवड ती च कानसेन आवड माझ्यात आली. आप्पा तुम्हाला मनापासून नमस्कार 🙏
त्यानंतर शाळेत असंख्य शिक्षक भेटले. सर्व च शिक्षक मनापासून शिकवत. मराठी, इतिहास, इंग्लिश धड्यांव्यतिरिक्त अवांतर वाचण्याकरिता प्रवृत्त केले.वक्तृत्व, सामान्यज्ञान, चित्रकला, खेळ सर्व स्पर्धा शाळेतून होत असे. त्या सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वंदन ! 🙏
शाळेत असतानाच वाचनात आले की "शिक्षक हे आयुष्यभर पुरत नसतात, त्यामुळे ग्रंथ हे च गुरु "
वाचनाची आवड कायम जपली,
अगदी विनोदी पुस्तकातून सुद्धा आपल्याला शिकवण मिळते च हे जाणवते.
निसर्ग हा तर मोठा गुरु, पण हे बऱ्यापैकी उशिरा कळले. तरी पण जेव्हा लक्षात आले, तेव्हा पासून स्वतः पुरते, कुटुंबापुरते निसर्ग रक्षण करण्याचा प्रयत्न करू लागले. त्याने खूप शिकायला मिळाले.
असे आयुष्यभर शिक्षण सुरु च राहते
भाऊ, बहिणी, शेजारी, नातेवाईक,
मित्र मैत्रिणी सुद्धा त्यात येतात. कधी आपली मुले आपल्याला शिकवतात ते ही गुरु च नाही का?
सर्व अशा ज्ञात अज्ञात गुरूंना आज नमन 🙏🏻
अर्चना कुलकर्णी.

No comments:
Post a Comment