संपला हा पावसाळा
लागती उन्हाच्या झळा
जीव हा नकोसा झाला
जागा नाही विसाव्याला !
निघाले मी लगबगा
कामे होती थोडी फार
मुलांची खरेदी झाली
प्याले पाणी गारेगार !
अचानक ढग आला
येता वारा दूर झाला
अहाहा इंद्रधनुष्य
उद्गारली छोटी हर्षाने !
पाहुनी उंच कमान
जाहली मंत्रमुग्ध मी
मारावी का एक उडी?
की घ्यावी एक गिरकी?
बघुनी आजूबाजूला
नुसती उभी राहिली
आठवे वयोमानाला
उगाचच ओशाळली !
असे असतें जीवन
पावसाळा न उन्हाळा
गोडी नाही तयावीण
शिकवी निसर्गशाळा !
अर्चना कुलकर्णी.
No comments:
Post a Comment