प्रिये चहा,
प्रिये चहा
रात्रीचा कलह विसरोनी,
शरण तुज आलो हा
पाणी हे उकळवत
आलं ते घाली किसून
चहा पत्ती ने रंग येत,
दरवळला गंध पहा.......
धार दुधाची वर ओतत,
चिमूटभर साखर घालत
गाळतो हा चहा मगात
बिस्किटासवे
आणिला तुज निकट
राग सोड सखे बिकट
सदा हसत रहा....
अर्चना
12.02/2018
No comments:
Post a Comment