काल Get Well Soon हे नाटक पाहिले . ब-याच दिवसांनी एक अप्रतिम नाटक बघितले असे वाटले ,
एक वेगळा विषय आणि अतिशय वेगळ्या प्रकारे त्याचे सादरीकरण . दोन्ही गोष्टी मनाला आवडून गेल्या .
नाटक नशा मुक्ती साठी अविरत प्रयत्न करणारे डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पुस्तकावर आधारित आहे .
नशामुक्ती केंद्रातून बाहेर पडलेल्या माणसाची आहे . त्याच्या मनात चालणारी द्वंद अतिशय उत्कृष्टपणे मांडली आहेत . कुठे हि उथळ भाषा नाही तरी हि सर्व विषय घेतले आहेत .
सोशल DRINKER पासून दारुडा होण्यास वेळ लागत नाही , आणि त्यातून मुक्त होणे कसे ते इतक्या प्रगल्भतेने दाखवले आहे , Hats off to Dr. Anand Nadkarni , Dr, Anil Avachat , नाट्य लेखक - प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक - चंद्रकांत कुलकर्णी
त्याच्या शी आपला काही संबंध नाही , मी काही नशा करत नाही असे न म्हणता प्रत्येकाने हे नाटक आवर्जून पाहावे असे मला वाटते .
कारण नशा नाही म्हणजे काय ? कोणाला दारू ,सिगारेट , पान तंबाखू याची नशा असेल . पण त्याही पेक्षा भयंकर अशी नशा असते , कौतुकाची , मोठेपणाची , पैशाची , हि च पुढे जावून सत्तेची होते ते आपल्याला जाणवत नाही . मग आपण जाणता अजाणता अनेकांवर शारीरिक - शाब्दिक अन्याय - अत्याचार करतो त्याची आपल्याला जाणीव देखील होत नाही . हि एक नशा च आहे हे सुद्धा मन काबुल करत नाही .
आणि मग कधी कुठे कमीपणा आला कि आपली चूक लक्षात न घेता , त्याचे खापर दुसर्याच्या डोक्यावर लादायला मोकळे होतो …….
मग ह्या नशेतून मोकळे होण्याकरिता आपण प्रयत्न तरी करतो का ?
नक्की " गेट वेल सून " कोणाला उद्देशून आहे ? हे तरी नक्की बघा ….
नाटकातल्या प्रत्येकाने आपली भूमिका अगदी चोख बजावली आहे .डॉक्टर झालेले संदीप मेहता अतिशय balanced charectar उत्तम रीतीने सदर केले आहे . स्वप्नील जोशी तर विचारायलाच नको , भूमिकेशी इतक्या समरसतेने काम केलेय कि केवळ लाजबाब …। स्वप्नील च्या भाषेत बोलायचे झाले तर God bless you Swapnil .
No comments:
Post a Comment