Thursday, 19 August 2021

लेखणी

 लेखणी...

मनातील भाव भावना

लिहून दुसऱ्यास पोचवी

ती असते लेखणी!


लेखकाची लेखणी

कधी शब्दांतून हसते 

कधी लिहिताना रडते

कधी गोंधळून जाते 

तर कधी होते रहस्यमय!


कवीची लेखणी

शब्दांसवे लाजते,

रम्य स्वप्नी नेते,

कधी अर्थासोबत

लपाछपी खेळते!


संतांची लेखणी

अध्यात्मिक असते

मधुर, रसाळ भाषेत

जीवनज्ञान देते!


माझी लेखणी

माझी सखी, सोबतीण 

आहे अगदी साधी

मनातले लिहितानासुद्धा

मध्येच घाबरणारी,

मोठ्या शब्दांचे भार

न पेलणारी,

सोपेच शब्द पुनः पुनः लिहिणारी

आठवणीत रमणारी,

पत्र लिहायला आवडणारी...


शिकतेय आता

स्वतः च्या प्रतिमेतून

बाहेर येऊन

कविसारखी स्वप्ने पहात

नवीन प्रतिभा

येईल का?ते शोधणारी.....


अर्चना कुलकर्णी....

No comments:

Post a Comment