आज रिओ ऑलिंपिक मध्ये भारताने मिळवलेली पदके बघून सर्वानाच मुली च सहारा आहेत असे वाटू लागले आहे, हे हि नसे थोडके
मध्यमवर्गाचा आज चा विचार करता तिथे मुलीला कधी च दुय्यम दर्जा देणे सोडले आहे। योग्य शिक्षण, नोकरी जे काही शक्य असेल ते आई वडील करत असतात , पण लग्न झाल्यावर अजून हि किती जणींना तिच्या मनाजोगते काम / करियर करायची संधी मिळते ?
त्याकरिता घरच्यांचा किती पाठिंबा असतो ? तिच्या कामाबाबत आपुलकीने विचारपूस होते ?
ती तिच्याकरिता नोकरी करते असा च सूर आज ही ऐकायला मिळतो ना?
मग मुलगी झाली की आई ला च वाईट वाटते की अरे बाप रे ही असे च आयुष्य घालवावे लागणार ?
ह्यात दोष कोणाचा ?
सासरी सर्व व्यवस्थित करून जरी ती माहेर चे करत असली तरी ही तिला दूषणे दिली जातात .
मग आज ची स्त्री घटस्फोटाचा विचार करू लागते , त्यात ही तिला च कमीपणा दिला जातो
तिला ऍडजस्ट करता आले नाही ?
काय बरोबर ना ?
मग कसली मुलगा मुलगी समानता ?
अर्चना कुलकर्णी
१०/१०/१६
No comments:
Post a Comment