Monday, 18 January 2016

JAGO GRAHAK JAGO

असा ही एक अनुभव -

गेल्या आठवड्यात एका मैत्रिणीबरोबर एका BRANDED चष्म्याच्या दुकानात जाण्याचा योग आला .  डोळे तपासणी मोफत होती , तिला करायची होती . मी  म्हटले आपण ही एकदा करून घ्यावी . UP university तून कसला तरी डिप्लोमा घेतलेली मुलगी डोळे तपासत होती . आधी जुना चष्मा लावून , वाचायला सांगितले , वाचले की मी सारे , तरी देखील नियमानुसार वेगवेगळी भिंगे लावून इथे तिथे  फिरवत पुन्हा नवीन नंबर , परत एकदा इलेक्ट्रोनिक मशीन वर हनुवटी ठेवून डोळ्यात प्रखर किरण सोडून त्याचे फोटो … 
हे सर्व सोपस्कार झाले , मग सुरु झाले तिचे पुराण (अर्थात हिंदीत )
खूप नंबर वाढला आहे , axis पण बदलला आहे. 
मी म्हटले ठीक आहे ,बघू थोडे दिवसांनी ,आता फक्त तुम्ही मला नवीन नंबर चा कागद द्या . 
नाही तो आम्ही देत नाही , तुम्ही इथे चष्मा घ्यायला हवा . 
नाही घेतला नवीन चष्मा तर डोळे तिरळे होतील , पुढे जावून ग्लुकोमा होईल , मोतीबिंदू होईल …। 
जे काही डोळ्याचे आजार  असतील ते सर्व होतील … असे सांगत राहिली … 

हे बघा मला नवीन नंबर चा कागद द्या  , मी तो घेवून येते दोन -चार दिवसात ,

नाही तो नाही देवू शकत . 
पण तुम्ही आज च चष्मा घेतलात तर तुम्हाला फ्रेम वर १५ % सूट मिळेल … अशी प्रलोभने सुरु झाली … 

तोवर मैत्रिणीने डोळे तपासून कोणता चष्मा वगैरे ठरवत होती , 
तिने इथे च घेतला चष्मा … 
तिचे आटोपल्यावर आम्ही निघालो . 

दुसर्याच दिवशी आमचे नेहमीचे Opthalmologist आहेत त्यांचेकडे गेले ,
म्हटले उगाच काही व्हायला नको …। 


डोळे तपासून त्यांनी निर्णय दिला, नंबर आहे तो च आहे, अजिबात बदलला नाही , चष्मा पण चांगला आहे . 
इतक्यात बदलण्याची  गरज नाही …. 


हुश्श झाले ना !


जागो ग्राहक जागो !

अर्चना . 

No comments:

Post a Comment