मैत्री
नेहमी एक मेसेज वाचनात येतो , मैत्री कशी असावी ? आरश्यासारखी जी कधी खोटे बोलत नाही व सावलीसारखी जी कधी साथ सोडत नाही .
सर्वांच्याच वाचनात आला असेल ,
सर्वांच्याच वाचनात आला असेल ,
हा मेसेज जुना आहे की नवीन आहे , कोण लेखक आहे वगैरे मला माहीत नाही ,
पण ते वाचले की नेहमी माझ्या मनात हा च प्रश्न येतो किंवा जाणवते मला ,
आरसा किंवा सावली हे दोन्ही ही जेव्हा आपण उजेडात ( प्रकाशात) असतो तेव्हाच उपयोग असतो .
काळोखात आरशात बघून काही दिसत नाही , तर सावली आपल्या सोबत नसते च .
म्हणजे मैत्री किंवा नाते हे फक्त आपण प्रकाशात असतानाच ठेवली जावी का ?
फेसबुक वर किंवा जीवनात अशी अनेक माणसे भेटतात , जी तुम्ही चांगल्या स्थितीत असताना आपल्याबरोबर असतात , पडत्या काळात पाठ फिरवतात .
मग अशी मैत्री /नाते काही कामाचे असते का ?
का त्याचेच कौतुक केले जाते ?
नक्की काय अर्थ असावा ?
अर्चना
३/०७/ २०१६
No comments:
Post a Comment