*आईची तिजोरी...!*
आप्पांच्या पगार झाला की पगारातली ठराविक रक्कम आईला द्यायचे; किरकोळ खर्चायला..! त्यात दुधबील, भाजीपाला, इतर किरकोळ खर्च वजा करता थोडीफार शिल्लक रहायची ती आई बचत करून ठेवायची...
घरात एक गोदरेज कपाट सर्वांचे.! आई अप्पा. आम्ही चार भावंडे असे सगळे मिळुन प्रत्येकाला वेगळे ही चैनीची कल्पना देखील नव्हती..त्यालाच वरती आरसा ,ते च अमचे ड्रेसिंग टेबल!
तो काळ ही तसाच होता... प्रामाणिक सरकारी नोकर.. त्याकाळी पगार कितकासा राहणार? आजच्यासारखं वेतन आयोगामध्ये लोळणारे नव्हते ते! त्यावेळी समाजातला आर्थिक दृष्ट्या सगळ्यात कमकुवत पेशा परत पांढरपेशा म्हणजे दुसरे काही व्यवसाय करणे शक्य नाही.
घरखर्च, चारही जणांचं शिक्षण, कपडे, वह्या पुस्तकं, आजारपण ह्यातच त्यांची महिनाअखेर दहाव्या दिवशी सुरू व्हायची... झाकलेल्या पाटीसारखी अवस्था... एक कोंबडं झाकावं तर दुसरं आरवायचं! अशावेळी आईची मदत व्हायची...
म्हणतात की घरची स्त्री लक्ष्मी असते. घरात धनधान्याला बरकतता असते. पगार वाटुन संपलेला असायचा तेंव्हा आईचा घरासाठी खर्च सुरू व्हायचा; साचवलेल्या बचतीतून...!
कुणाचा हात पोहोचू शकणार नाही किंवा कुणाचं सहज लक्ष जाऊ नये म्हणून घरातल्या घरात साचवून ठेवायची ती वेगवेगळ्या क्लुप्त्या करून...! आणि माझ्यावर किंवा माझ्या स्मरणशक्ती वर विश्वास म्हणून मला सांगून ठेवायची ! ते सर्व ती घरासाठीच करते हे त्या बाल-किशोर-तरुण वयातही समजायचं...!
हाडाची शिक्षिका होती ती ,आमच्या अभ्यासावर तिचे लक्ष असायचेच. आमचे शालेय शिक्षण संपल्यावर तिला रिकामपण वाटू लागण्यापर्वीच तिने कामवाली च्या दोन मुलांना (एक मुलगा एक मुलगी) आमच्या घरी मोफत शिकवायला सुरुवात केली.
कामवाली चे दर महिन्याला काही शिल्लक टाक म्हणून बौद्धिक घेतले. तिने ही १०रू तुमच्याकडे ठेवत चला सांगितले . तो ही हिशोब पेन्सिल ने लिहून ठेवायला मला संगे व दुसऱ्या दिवशी तिला सांगत असे. मग तिने देखील कोणाचे बदली काम केले की पैसे मिळत ते ही घरी न नेता आईकडे सोपवून जाई . दिवाळीला त्या पैशातून स्वतः करिता चांदीचे पैंजण की जोडवी काही तरी घेतले. ते बघून इतर ही दोन तीन बायका आईकडे पैसे जमवू लागल्या. निळा डबा तो अजुन ही आठवतोय. कारण नेहमी तू म्हणायची की ह्यातले पैसे आपले नाहीत . अर्चना तू लक्षात ठेवून त्यांचे त्यांना देशील.
फडतळात वीसपंचविस कप्पे असतील...! स्वयंपाक घरातील सगळ्या छोट्या छोट्या डब्यामधून ५/२रू नोटा तुझ्या ठेवलेल्या असत.
अप्पा ना transistor घ्यायचा होता ,तेव्हा पटकन तू च दिलेस सगळीकडून काढून पैसे.
पुढे कधी कपाटाच्या पायांच्या खाचेत, ड्रॉवरच्या बाजूच्या जागेत... असे किती तरी वेळी सापडले...! कितीतरी वेळी तू साचवलेल्या पैशातून घरच्या गरजा पूर्ण केल्या; जशा जमतील तशा...!
ना स्वतःसाठी काही दागिना केल्याचं आठवत, ना कधी साड्या. मेकप तर कधी आठवतही नाही तिनं केल्याचं!
साधी पावडर काय ती तेवढं लावतांना दिसायची... साधी, भोळी, भाबडी... साधं आयुष्य...!
वडिलांची मिळकत जेवढी त्यावर गुजराण करत जपलं सारं... हट्ट नाही की हेका नाही... परिस्थितीशी समझोता...
मला मुलगा झाला त्यावेळी मला व बाळाला हौसेने सारे केलेस.
त्यानंतर ही प्रत्येक भेटीत हातावर ५/१०/५०रुपये ठेवल्याशिवाय सोडत नसे
अप्पा अंथरूणाला खिळले तेंव्हाही त्यांच्या दर महिन्याला काढलेल्या आणि साचवलेल्या पेन्शन मधूनच त्यांचे औषधपाणी, दवाखाना झाला... माझी मदत म्हणून किरकोळ..!
वडील गेले तेंव्हाही रितिरिवाजाप्रमाणे जेंव्हा घरातील डबे धुवायला घेतले... तेंव्हाही किती तरी डब्यात हजार पंधराशे सापडले पुरचुंड्या करून त्यावर आकडा लिहून ठेवलेल्या...!
तिला विचारलं तर भोळ्या मनानं म्हटली _"मलाच नाही माहीत...पण प्रत्येक बॅग मध्ये सुद्धा पैसे सापडतील मी गेल्यावर
व्यावहारिक नव्हतीच ती कधी... अन जमलं ही नाही तिला कधी...! स्वतः ऍडमिट झाली तेंव्हाही तिचीच बचत कामी आली दवाखान्यासाठी... तिच्या उत्तर कार्यासाठी...! झळ नाही देऊन गेली जातांनाही...!
_'आई..._
_तुझ्या बचतीतले पैसे तुझ्या दवाखान्यासाठी खर्च होऊन शेवटचे उरलेलेे पैसे मोजले तेव्हा डोळ्यात फक्त पाणी आले.....! कित्येक पुरचुंडी दिसल्या ,उघडून बघितले की पाच ,वीस ,पन्नास रुपयाच्या नोटा एकत्र ठेवलेल्या. लक्ष्मीपूजनाचे.सारे coins neet ठेवलेत ग आई..! एका लक्ष्मीची एका गृहलक्ष्मीने केलेली पूजा खरच भोळी असायची...! श्रद्धा खूप तुझी... देवानं दिलंही सढळ सारं...! खूप हौशीने साजरी करायचीस तू लक्ष्मीपुजन...! १रू पासून ५००रू च्या वेगवेगळ्या चलनी नोटा तू व अप्पा नी जम्मवलेल्या त्याही ठेवल्या आहेत..... तू शिसपेन्सिलने लिहिलेले हिशोबाचे कागदही तसेच ठेवलेत तुझ्या डब्यात...!
.._
एक मित्र बोलता बोलता खखूप छान सांगून गेला; दारी आला होता तर... _"लिहा तुमच्या आठवणी लिहा... लिहिलं नाही तर पुढच्या पिढीला कसं समजणार की तुम्ही काय आणि कोण होतात ते...? कळू द्या पुढच्या पिढीला... वाचनाने जितकं समजतं तितकं सांगुन कमीच... म्हणून लिहा... कडू, गोड... लिहिण्यात चित्र उभं करा..."_
छान सुचवून गेला तो...!
आई, तू आजही हे लिहिताना
तू तशीच उभी राहिलीस समोर, साडी ,कुंकू ,मंगळसूत्र ,हातात काचेच्या बांगड्या !
अर्चना
९/९/१९
*******

No comments:
Post a Comment