ख्रिसमस
सांता क्लॉज येणार, अशी
नाताळ मधे खुप मजा असायची.अतिश नितीश किन्शासाला असताना रात्री मोजे लावायाचो, झाडाला झिरमिळ्या लावायच्या....
अन सकाळी उठल्यावर मज्जाच मज्जा
सांता चॉकलेट्स,खाउ, खेळणी द्यायचा
खुप मजा यायची,नितीश तर जाम खुशीत ! कुठून आला असेल सांता? त्याला कसे कळते मला काय आवडते?
मग अतीश हळूच माझ्याकडे बघायचा, गालातच हसायचा ....
कुणी दिला हा खाऊ? खेळणी?
सांता आला होता, तुला आवडतात म्हणुन दिलि.....बाबा
मग मला का नाही उठवलेला ?.....
सांता म्हणाला त्याला झोपु द्या...बाबा म्हणाले.
सांता कधिच भेटला नाही त्याला.
एका नाताळला मोजा लावला
व म्हणाला दादा आज रात्री आपण झोपूया च नको..
दादा हसू लागला, का हसतोस रे मी म्हटले
मला माहितेय
सांता बिंता काही नसतो..
आई बाबा च खा,खेळणी आणुन ठेवत असतात..हसत म्हणाला.......
चला मग आता नको डेकोरेशन.. मी म्हणाले
हे ग काय आई?
"अरे ज्या दिवशी तुम्हाला कळत ना
कि सांता बिंता काही नसतो.
त्या दिवसा पासुन तुमच लहानपण संपलेल असत"
आणि खरंच त्या वर्षांपासून घरात ख्रिसमस डेकोरेशन करावे लागले नाही.
काल अतीशने canada त त्याच्या बिल्डिंग मध्ये डेकोरेशन ला मदत केली त्यावरून आठवले हे सारे.....
अर्चना
13/12/2019.
No comments:
Post a Comment