संध्याकाळी बस ने येताना
संध्याकाळची वेळ असल्याने ,बसला बर्यापैकी गर्दी होती . स्त्रियांकरिता राखीव आसनावर एक वृद्ध गृहस्थ बसले होते . पुढील स्टोप वर बस थांबली बर्याच महिला चढल्या . त्यातल्या एकीने सांगितले की ही जागा महिलांकरिता आहे , ज्येष्ठ नागरिकांना त्या बाजूला सीट आहे . त्यावर तो माणूस म्हणाला तिथे लोक बसली होती ,आहेत म्हणून मी इथे बसलोय . तिथे बसलेले ज्येष्ठ नागरिक होते का ? तर नाही , पण प्रत्येक जण आपण त्या गावचेच नाही अशा अविर्भावात बसले होते किंवा जाणूनबुजून डुलक्या काढत होते .
आता ती महिला उभी च राहिली . अजून पुढच्या स्टोप वर अजून काही महिला चढल्या .
त्यातल्या एकीने अगदी तुम्ही इथून उठा , हि स्त्रियांची जागा आहे , तुम्ही दुसर्या बाजूला बसा . असे परत परत सांगून त्या माणसाला उभे राहायला लावले . व स्वतः त्या जागेवर बसली . त्या वेळेस conductor आला व एका तरुणाला सांगून ही ज्येष्ठ नागरिकांची जागा आहे , तुम्ही इथे बसा ,असे सांगून त्यांना बसायची जागा दिलि.
प्रसंग इथे संपला नाही , जी स्त्री अगोदरच्या स्टोप वर चढली होती , तिने दुसरीला म्हटले असे वयस्कर माणसाला उठवणे बरे नाही केले तुम्ही .
ओ , तुम्ही मला काय बरे आणि काय वाईट ते शिकवू नकात . खरे तर तुम्ही च आधी सांगायला हवे होते .
मी सांगितले पण ते उठले नाहीत आणि दुसरी सीट पण रिकामी नव्हती .
अच्छा , म्हणजे तुम्हाला जे जमले नाही ते मला जमले म्हणून तुम्हाला राग का ?
नाही , असे नाही पण म्हाताऱ्या माणसाला उठवणे वाईट च .
आता गप्प बसा , तुम्हाला बसायला मिळाले नाही तर माझ्या डोक्याशी कटकट नका करु.
मला जे योग्य वाटले ते मी केले ….
कोणाचे योग्य ?
अर्चना
२८/०४/२०१५

No comments:
Post a Comment