Sunday, 5 November 2023

ध्रुव बाळ (मुक्तछंद )

 ध्रुव...

सूर्यवंशी असे राजा

एक उत्तानपाद

सुरुची अन सुनीती

दोन भार्यांचा तो नाथ!

सुरुची असे पट्टराणी

सुनीतीला ना पुसे कुणी,

सुरुचीपुत्र नाम उत्तम

खेळे राजासवे दिनरात,

सुनीती चा पुत्र ध्रुव

दिसे तो बहू सुंदर!

अचानक तया वाटे

राजाच्या अंकी बसावे,

जावून बसता ध्रुव

राजाच्याही मनी

वात्सल्य दाटे फार

खेळे दोघांसवे प्रेमे

आली सुरुची धावत

म्हणे ध्रुवास ढकलत

तू बसू नको इथे मांडीवरी

येऊ नको राजगृही...

ध्रुवास दुःख झाले फार

जाई मातेकडे सत्वर,

का असे ग मला ना जागा

राजाच्या घरात?

अशी जागा दे मजसी 

जिथे असे मला स्थिर स्थान,

सुनीतीकडे नव्हते उत्तर

चाललो मी वनात

शोधतो अशा स्थानास

वदे ध्रुव मातेस,

सुकुमार बाळ ते निघाले

चाले घनदाट जंगलात

पाहुनी बालकास,

देवर्षी नारद गहिवरले,

ॐ नमो वासुदेवाय

गुरुमंत्र त्यास दिधला,

ध्रुवाने केले घोर तप

श्रीविष्णू होती प्रसन्न,

काय हवे तुजला सांग,

"स्थान असे द्या मजसी

जिथून जा कोणी ना म्हणे

स्थिर राहण्याचे द्यावे वरदान"

श्रीविष्णूच्या आशिषाने

ध्रुवास मिळाले स्थान उत्तरेस,

असे त्याचे ते अढळपद

सप्तर्षीदेखील घालती फेरे.

देवाप्रति भक्ती,अचल विश्वास

दावतसे ध्रुव जगतास!



अर्चना कुलकर्णी..

No comments:

Post a Comment