नवरात्र चारोळी
नवरात्रीचा उत्सव सृजनाचा
जागर हो तो स्त्रीशक्तीचा
आदर त्या मातृभक्तीचा
आशिष लाभो नवदुर्गेचा.....
आदिमाया शक्ती तुझी
सर्वत्र पसरलेली
मांगल्याने भारलेली
कोषाकोशातून दडलेली
****
तुज पंख दिले देवाने
घे तू गगनभरारी
लाव जिद्द पणाला
कर आकाशाची वारी
झाली वरुणकृपा
येती सरींवर सरी
चिंब होती वृक्षवेली
बहरली सृष्टी सारी!
आज आहे पिठोरी
आपला मातृदिन
मुलांना देवून वाण
करू साजरा सण
गोडधोड खाऊन
करू मातेला वंदन!
अर्चना कुलकर्णी
प्राजक्त फुलाचे शिवलिंग
करू मनोभावे पूजन
शिवमंदिरी दुग्धाभिषेक
जटाधारी देई समाधान!
चारोळी
गेले असता पंढरपुरी
दिसला मज श्रीहरी
मूर्ती गोमटी गोजिरी
उभा होता विटेवरी
No comments:
Post a Comment