Friday, 27 October 2023

कोजागिरी

 पौर्णिमा आज कोजागिरी

मिळूनी सारे करू साजरी,

शीतल चंद्रकिरण पिऊनी

केशरी मसाला दूध प्राशुनी,

खेळ, गप्पासवे जागरणे

पहावे चंद्राचे रूप देखणे,

नात्यात विश्वासाचा गोडवा

जगण्याचा सोहळा व्हावा!


अर्चना कुलकर्णी

28/10/2023

No comments:

Post a Comment