Wednesday, 15 March 2023

माझ्या अस्तित्वाच्या खुणा

 *माझ्या अस्तित्वाच्या खुणा*


माझ्या अस्तित्वाच्या खुणा

घरभर पसरलेल्या आहेत

प्रत्येक वस्तूत त्या असतील,

स्वयंपाक घरातल्या प्रत्येक भांड्यावर

माझं अस्तित्व असेल

स्वयंपाक घराचा कोपरा न् कोपरा

माझ्या अस्तित्वानी भारलेला असेल..

घरातली प्रत्येक खोली

जिथे जिथे माझ्या हाताचा स्पर्श झालेला

तिथे माझे अस्तित्व आहे...

अंगणात वृंदावनात डोलणारी

माझी तुळस

रोज तिला पाणी घालते,

तिथे सुध्दा माझ्या अस्तित्व 

अंगणात मी लावलेली झाडं

त्यांना आंजारताना,गोंजारताना

माझ अस्तित्व जाणवतं त्यांना

माझ्या स्पर्शाने टवटवीत होतात ती...

आणि ज्याच्यासाठी मी माझं

अस्तित्व विसरले,

ज्याला स्वतःचे अस्तित्व निर्माण

करण्यासाठी मी झटले

त्याला माझे अस्तित्वच मान्य नाही.

एक दिवस असा येईल

माझे अस्तित्व जाणवेल तुला

प्रत्तेक क्षणाला

पण तेव्हा मात्र मी दूर निघून गेलेली असेन

कधीही माझ्या अस्तित्वाची

जाणीव करून न देण्यासाठी!


अर्चना कुलकर्णी

15/04/2023

No comments:

Post a Comment