Tuesday, 18 March 2025

मनातले

 शब्दरजनी साहित्य समूह 

स्वैर लेखन...


Give me some sun shine 


डिसेंबर 2010 ची गोष्ट आहे.माझा धाकटा मुलगा दहावीत होता. Prelims नंतर मुलं कधी शाळेत तर कधी घरीच अभ्यास करत. मोबाईल अस्सल्याने फोनवर शंका विचार्याच्या व तेवढ्यात इतरही गप्पा सुरू असत. तेवढा तर बदल हवाच म्हणून मी कधीच त्याला काही बोलले नाही. पण त्या मित्रांच्या बोलण्यात आले, अरे तन्मय(topper )चा काही फोन नाही... त्याला केला तरी घेत नाही. व्हाट्सअप नव्हते. माझ्या मुलाने नितीशने त्याला फोन लावला. रिंग टोन ऐकली... Give me some sunshine.... वाजत राहिली आणि फोन बंद झाला. नितीश मला म्हणाला मी त्याच्या घरी जावून येऊ का? रिक्षाने जातो पटकन येतो, त्याशिवाय माझा अभ्यास होणार नाही. Three idiots मधील त्या गाण्याची पार्शवभूमी त्याला अस्वस्थ करत होती.

नितीश त्याच्या घरी गेला, अर्थात त्याच्या आईने दार उघडले. "काकू, तन्मय कुठे आहे?"

"तू कोण?"

"मी नितीश कुलकर्णी, मी तन्मयच्या वर्गात आहे."

"अच्छा, कितवा नंबर असतो तुझा? आणि आता अभ्यास नाही का तुला?"

"माझा पहिल्या दहात असतो नंबर, अभ्यास करतोय पण तन्मयशी बोलायचे आहे."

"हे, बघ मी फक्त हुशार मुलांशीच मैत्री कर असे सांगितलं आहे त्याला. आता आलाच आहेस तर बोल 2 मिनिटे. "

तन्मय बाहेर आला, आईसमोरच म्हणाला "कंटाळा आलाय life चा, कोणाशी बोलायचे नाही, tv बघायचा नाही, फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. का तर बाबानाच्या ऑफिसमधील कोणाच्या तरी मुलीला गेल्यावर्षी 97% पडले.. तो माणूस तर किती जुनिअर पोसिशन वर आणि माझे बाबा VP आहेत.  

आणि रडू लागला."

नितीश म्हणाला "काकू, फक्त हुशार मुलांशी बोल.... मग सचिन तेंडुलकर ने कोणाशीच मैत्री करायची नाही का? त्याच्या क्षेत्रात तो सर्वांत्कृष्ट.... अंबानी सर्वात श्रीमंत त्यांनी इतर कोणाशी बोलायचे नाही... लता, आशा ह्यांनी तर अगदीच गप्प रहावे....कोणी कोणाशी का बरोबरी करावी? तन्मयने अभ्यास करण्यासाठी थोडे तरी वेगळे हवेच ना? त्याच्या फोनची रिंगटोन ऐका आणि तो चित्रपट पहा आणि ठरवा."

एवढे बोलून त्याने तन्मयला जवळ घेऊन, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत असे म्हणून निघाला....घरी आल्यावर मला फक्त म्हणाला की तो खूप अभ्यास करतोय. म्हणून वेळ नाही....

जूनमध्ये result च्या दिवशी तन्मयची आई मला भेटली. मी तर नितीशने मित्रांना द्यायला पेढे घेतले होते त्यातील एक त्यांच्या हातावर दिला. तन्मय तर पहिला आला, अभिनंदन म्हटले. त्यावर त्या म्हणाल्या नितीश तर सहावा आला, तरी तुम्ही पेढे वाटताय?

मी म्हटले, माझा मुलगा चांगल्या मार्कांने पास झाला मला त्याचे कौतुक आहे. माझा आनंद तोच आहे तो इतरांकडे बघून कमी का करू?


त्यावर त्या म्हणाल्या नितीशने तुमच्याकडून हा चांगला गुण घेतला आहे.. 

आणि मग त्यांनी वरील सर्व प्रसंग सांगितला.


खरोखर आपण आपला आनंद इतरांशी तुलना करून कमी करतो का? 


अर्चना कुलकर्णी.

No comments:

Post a Comment