Tuesday, 18 March 2025

लेखिका

 उपक्रम 10 मार्च 2025 

आवडती लेखिका /कवी 


वाचन हा माझा छंद आहे. अनेक लेखिका, कवी माझे आवडते आहेत. वेगळ्या व्यक्तीवर लिहावे म्हणून आवडत्या असणाऱ्या मंगला गोडबोले ह्यांच्याविषयी.

विनोदी लेखिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा म्हणजे कुठे तरी आपल्याशी जुळत जातात. आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगातून विनोदी लिहिण्याचे कसब एकदम मनात ठसते. लोकसत्तामध्ये येणारे त्यांचे लेख अगदी ताज्या बातम्यावर आधारित विनोदी भाष्य खूप भावायचे. कथसंग्रह हातात पडल्यावर तो पूर्ण झाल्याशिवाय मी कधी खाली ठेवला नाही. झुळूक, पुनः झुळूक, पोटाचा प्रश्न, पर्स हरवलेली बाई, अशा अनेक कथा नावासहित लक्षात आहेत आणि पुनः पुनः वाचताना तेवढेच हसू येते.   हसत हसत जगायचे असेल तर *महिलांनी* जरूर वाचावीत अशी पुस्तके...


अर्चना कुलकर्णी. नासिक

No comments:

Post a Comment