Tuesday, 18 March 2025

भय

 भय...

नोव्हेंबर 1999, मी दोन मुलासह आफ्रिकेतील कॉंगो ह्या देशात गेले. त्यापूर्वी 3 महिने, माझे यजमान नोकरीनिमित्त तिथेच होते. अतिशय अशांत देश असेच कानावर होते. पण तिथे बरेच भारतीय होते, त्यांच्याशी मैत्री झाली, आणि दहा दिवसात एका मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस त्यानिमित्ताने सगळ्यांना प्रथमच भेटले. पार्टी सुरू असतानाच बातमी आली curfew लागलाय. पार्टी थांबवून आम्ही घरी निघालो. रस्त्यात ठिकठिकाणी हातात बंदूक घेऊन  पोलीस उभे. आयुष्यात प्रथमच इतक्या संख्येने बंदूकधारी पोलीस पाहिले अगदी हातच्या अंतरावर.. भीती म्हणजे काय ते जाणवले. दुसऱ्या दिवसापासून दीड महिना शहरात संचारबंदी होती.  

अर्चना कुलकर्णी

No comments:

Post a Comment