तू छान दिसतेस....
आज चक्क आरसा म्हणाला
*तू छान दिसतेस*
नको तो मिडी, नको ती जीन्स
ह्या नववारीत तू छान दिसतेस...
नाकात मोत्याची नथ,
कपाळावर चंद्रकोर
केसात माळलास गजरा
खुलून दिसतोय नखरा!
डोईवर घेता पदर
का झुकली माझी नजर?
आठवणीने कुणाच्या
गालावर पसरली की लाली!
काय होतंय आज वेगळं?
भासे नवीन सगळे!
सरले आता बालपण
अनुभवते सुंदर क्षण!
बोलतोय आरसा माझ्याशी
अन आई म्हणतेय
रेंगाळू नको आरश्यापाशी
अन मी माझ्याशीच हसतेय!
अर्चना कुलकर्णी.
No comments:
Post a Comment