सहज मनातले....
आमच्या घराशेजारील बंगल्यात एक वर्षांपासून girls हॉस्टेल सुरू आहे. 6/7 कॉलेज ला जाणाऱ्या मुली राहतात. जेंव्हा पहावे तेंव्हा त्या मोबाईलमध्येच. मैत्रिणी बनून आपापसात बोलताना दिसत नाहीत. किती वेड लावलंय ह्या मोबाईलने, असा सारखा विचार माझ्या मनात येतो.
पण महाशिवरात्रीची गोष्ट आहे. एक मुलगी बंगल्याच्या मागे आली, मोबाईलवर बोलतच. पप्पा तुम्ही vdo स्विच करा, मला बघायचे आहे. आणि मी बाहेर आलेय कोणी डिस्टर्ब नाही होणार.
नाही ग जमत. थांबा मी पुनः कॉल करते. लगेच vdo कॉल केला. पप्पा तुम्हाला बरे नाहीये, तुमचा आवाज सांगतोय.
नाही ग आता बरे आहे.
काय झाले होते?
थोडा ताप होता.
थोडा म्हणजे किती? Dr कडे गेलात का?
आता नाहीये ताप.
काय खाल्लेत सकाळपासून?
अगं आज शिवरात्री उपास आहे.
मावशीनी डबा नाही पाठवला?
मी नको म्हटले.
किती थकला आहात. आता काय खाणार?
थांबा, मी मावशीना फोन करून सांगते उपासाचे पाठवायला...
आणि तुम्ही ते आल्यावर खाताना मला vdo कॉल करा, तरच मी जेवेन..
अशी प्रेमळ धमकी वडिलांना दिलेली ऐकली आणि मोबाईलमुळे हे ही शक्य आहे असे जाणवले....
अर्चना
No comments:
Post a Comment