#जनी_म्हणे_देवा
# मैत्र जीवाचे
#थंडर... माझे पिल्लू
#अर्चना कुलकर्णी...
थंडर माझे पिल्लू असे मी आता म्हणते पण तो घरात आणला माझ्या धाकट्या मुलाच्या आग्रहाखातर.. अगदी छोटू दोन महिन्याचे पिल्लू. मी तर घाबरत होते, आणि सांगितलं होते तेंव्हा की मी फक्त त्याचे जेवण बनवून देईन. बाकी सर्व तुम्ही करायचे. धाकटा नितीश बाळाचे करावे त्या प्रेमाने त्याचे शू शी पुसणे, त्याला योग्य वेळेस बाथरूम मध्ये नेणे, फिरायला घेऊन जाणे सर्व करत होता. अतिशय खेळकर...
गोंडस मुलं सगळ्यांनाच आवडतात.तसेच त्याचे झाले,त्यांचं रुसणं, घरभर धावणं, आपल्या जवळ लाड करून घ्यायला येणे हे सगळं मला आनंददायी वाटू लागले.मी बाहेर गेले की लगेचच त्याचे वाट बघणे सुरू, गच्चीवर येऊन बसायचा.
माझ्या स्कूटरचा आवाज ऐकला की धावत कौलवर येई. पडेल की काय असे वाटे. फार वेळ सगळे घराबाहेर असले की चिडायचा आणि मग चादरी ओढून काढ, सोफ्यावर उड्या, कुठे कागद फाड, अशा खोड्या सुरू...लहानाचा मोठा होत होता, आता आम्हाला उशीर झाला की एका कोपऱ्यात जावून बसे, हाक मारली तरी बघणार नाही. मग जवळ जावून लाड करावे, सॉरी म्हणावे, तेंव्हा भुंकून जणू विचारी का उशीर केलात, मी कंटाळलो ना!
अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता. कधी कोणावर ओरडत नसे. परंतु कोणी अनोळखी आले की वास घेऊन बघेल, त्या व्यक्तीला गोल फेरी मारून त्यांच्या तोंडाकडे बघेल.. ती व्यक्ति हसली की त्याचे लाड करावे असे वाटे.जर शांत उभी असेल तर थंडर देखील जागेवर शांत जावून बसायचा.
24 जून त्याचा वाढदिवस आम्ही अगदी केक कापून साजरा करत असू...
लहान मुलांना थंडरशी खेळायला खूप आवडे, घरी येऊन खेळत त्याला ही मजा येई. एकदा एक दोन अडीच वर्षाचा मुलगा त्याच्या पाठीवर बसला व कान ओढले. तरी तो ओरडला नाही. मुलाला बाजूला केल्यावर हा त्याच्याजवळ जावून उभा राहीला.
इडली व icecream त्याचे प्रचंड आवडते पदार्थ... Weak point च म्हणा न.. आम्ही खाताना तो अगदी बघत राही, आमचे झाले की लगेच भुंकून त्याची मागणी.. Icecream तर चाटूनपुसून.
असा माझा थंडर चौदा वर्षे आमच्याकडे होता. दोन्ही मुलांइतके त्याच्यावर प्रेम केले.
शेवटचे आठ दिवस मात्र त्याला खूप त्रास झाला. डॉक्टर उपचार करत होते पण उपयोग झाला नाही.
दुर्दैवाने माझ्या थंडू 15/12/2021 रोजी दुःखद निधन झाले.
आज ही कोणी कुत्रा दिसला की त्याचेच नावं ओठावर येते.
अर्चना कुलकर्णी.
No comments:
Post a Comment