Monday, 8 March 2021

तू कुटुंबप्रमुख

 तू....


जाणवली नाही ती

बिकट परिस्थिती,

सदैव खंबीर तू

म्हणून गंभीर तू,

स्वप्ने मोठी मुलांची

तू पुरी करायची,

ओझे खांद्यावरचे

त्यासाठी झटायचे,

तूच शिकवायचे

डोळ्यांनी हसायचे,

माया नजरेतली

करडेपणाखाली,

नेहमी लपलेली

मलाच समजली,

वरून फणस तू

आतून गोडवा तू,

आधारस्तंभ माझा

कुटुंबप्रमुखच तू!


अर्चना कुलकर्णी...

No comments:

Post a Comment