Thursday, 25 March 2021

आधी च उल्हास

 आधी च उल्हास


तिला होती फिरायची हौस

त्याला फक्त कामाचा सोस,

नेहमी म्हणे होईन जेव्हा निवृत्त

तेव्हा फिरू सारे अक्ष /रेखा वृत्त,

तारुण्याची वर्षे अशीच गेली 

हा हा म्हणता निवृत्ती आली,

डायबेटिस, ची गोळी लागली

पाठ, कंबर दुखू लागली,

तरीही ती जिद्दीला पेटली

कन्याकुमारी ची सहल ठरवली,

सासूला नणंद बघेन म्हणाली 

पैसे भरून सारी तयारी केली,

अन आली करोनाची स्वारी

आता बसा सारे आपल्या घरी

तो आला खुशीत

हसला हळूच मिशीत

म्हणणात ना आधीच उल्हास

त्यातच आला फाल्गुन मास!


अर्चना कुलकर्णी

No comments:

Post a Comment