Thursday, 11 March 2021

पुरुष

 पुरुष...

तू पुरुष आहेस,

पुरुषप्रधान संस्कृतीचा

नायक आहेस,

तुला रडण्याचा अधिकार नाही

तू कणखरच असायला हवे,

कठीण प्रसंगी

तू शांतच राहायला हवे

कारण हळवेपण तुला शोभत नाही

भाऊ, नवरा, बाप

तिन्ही नात्यात समजूतदार

तुलाच व्हायचे,

पण ते कोणा नाही समजायचे,

सरक्षणाची घेऊन जबाबदारी,

काही निर्णय घ्यायचे

कठोर हृदयी असे ऐकायचे,

खांद्यावर घेऊन ओझे

तू च तर ते वहायचे,

काही पुरुषांच्या चुकीच्या वागण्याने

तुला सतत सावध राहायचे.....


अर्चना कुलकर्णी...

No comments:

Post a Comment