आबा, हे मंदिर कसले?
असे जुने,पुराणे,पडके
शेजारी जीर्ण झाड बोडके
इथे येण्याचे का ठरवले?
अरे बाळा,आज हे मंदिर
झाले असेल जुने, पडके
कधी काळी होते रम्य देखणे
नाजूक सुंदर कोरीवकाम
होते आपल्या गावाचा मान
आपल्या घरास पूजेचा मान
ह्या भोंवती मी खेळत होतो
फुले सुगंधी देवास देत होतो,
तारुण्याचे पंख फुटले
मी ही मग गाव सोडले
स्वार्थी दुनियेत
यशाची नशा चढली
अहंपणाची भाषा आली
त्यात सारी नाती विसरली
आई बाबांची भेट विसरलो
मंदिराचे पवित्र्य विसरलो,
सरता तारुण्य,
जाग मला आली,
अहंपणाची धुंदी क्षणात ओसंरली,
तू जा माघारी,
आपल्या बाबांच्या शहरी,
माझी आता इथेच पथारी,
आकाशातील सूर्य
देईल मज साथ,
येईल उद्या पालवी
ह्या वठलेल्या वृक्षास,
किलबिल करत पक्षी येतील,
पुनः मंदिरास येईल झळाळी!
अर्चना कुलकर्णी.....
No comments:
Post a Comment