हाक माझी ऐक ना......
निःशब्द आर्त हाक ती
असंख्य संकट सभोवताली
दुःखाची काळी काजळी
हुरहूर ती मनात दाटली,
नाही कोणी आता वाली
हाक मारण्या जीभ अडखळली
ती हाक माझी ऐक ना
सखा होऊनी ये श्रीकृष्णा
भेदुनी दुःखाची व्युह रचना
सोडवी मज मधुसूदना
करते पुनः पुनः याचना
मीरा तुझीच मी मनमोहना!
अर्चना कुलकर्णी..
No comments:
Post a Comment