Wednesday, 14 April 2021

नसतेस घरी तू जेव्हा...

 नसतेस घरी तू जेव्हा....(नेट ची लाईन )


नसतेस घरी तू जेव्हा

जीव उदास, खिन्न होतो

आंतरजालाचे तुटती धागे

कायप्पा (व्हाट्सअप ) निपचित पडतो 


नाती सारी सुटून जावी

मन तसेच आक्रन्दू पाही

Smiley त जीव अडकून राही

बोलण्या शब्द ही ना येई!


फेसबुक चे उघडता पान

फ़ोटोज चा पत्ता नाही 

Like अन कंमेंट दिसत नाही

मन तिथे ही रमत नाही!


वाचण्यास घ्यावे काही

पुस्तकात नवीन नाही काही 

गाणी, सिनेमा तुजवर सारे काही

मन कोंडल्यागत होई!


बाहेर फिरावे म्हणता

मार्गदर्शक कोणी नाही

अवलंबून तुजवर राहता

डोक्यात आता काही नाही


तुजवाचून झाले मोठे

पण आता क्षण ही ना चैन पडे

तुजवाचून आता जन्मच सारा अडे

आगमने तुझिया मनी वाजती चौघडे!

अर्चना कुलकर्णी 

No comments:

Post a Comment