Friday, 19 February 2021

तू

 तू....


तू अशीच आहेस,

एकटी एकटी जगणारी ....

सर्वात असाताना देखील,

स्वतःच्या शोधात फिरणारी .....


तू अशीच आहेस,

खूप प्रेमाने बोलणारी

आपल्या सरळ वागण्याने ,

सर्वाना सहज आपलसं करणारी .....


तू अशीच आहेस ,

जीवनाच मर्म जाणणारी ..

साध्या मैत्रीच्या नात्यालाही,

आपला धर्म मानणारी ....


तू अशीच आहेस,

दुःखातही सदा हसणारी....

अन हसत हसता

नशिबाला लाजवणारी...


तू अशीच आहेस,

दुसऱ्यांना सतत प्रकाश वाटणारी ....

पण स्वतः मात्र,

काळोखात लपणारी....


तू अशीच आहेस,

सर्वांना भरभरून जेवायला वाढणारी

पण स्वतः मात्र

दर दोन दिवसाआड उपास करणारी...



तू अशीच आहेस,

सगळ्यांपासुन दुर दुर जाणारी .

जाताना मात्र सगळ्यांच्या मनात

घर  करुन रहणारी ........



अर्चना कुलकर्णी....

No comments:

Post a Comment