झंकार....
वय तुझं अल्लड
अन मन अगदी कोवळं
भिरभीरती नजर
अन हृदय अगदी सोवळं!
सहज भेट झाली आपली
पाहून तुला प्रीत जागी झाली
तू नाजूकपणे हसली
अन मी बाजी जिंकली!
गोष्टी ठरल्या आठ दिवसात
सर्वांच्या साक्षीने तू माझी झाली
भेटलो नाही कधी एकांतात
तरी माझ्या स्वप्नात तू रमली!
वाट पाहता तुझी राणी
ऐकु येई पैंजणांचा झंकार
बांगड्यांची किणकीण कानी
मन होई उगाच सैरभैर!
अर्चना कुलकर्णी.
No comments:
Post a Comment