Wednesday, 30 December 2020

नाचता येईना अंगण वाकडे

 नाचता येईना अंगण वाकडे !


खाता येईना तोंडाचे बोळके

वासच  येईना नाक गळके

रंग दिसेनात कपडे मळके

नाचता येईना अंगण वाकडे !


चालता येईना चिखल फार 

धावता येईना, खडबडीत रस्ते 

पोहता येईना पाणी गार 

नाचता येईना अंगण वाकडे !


पाणी तापेना  गळके मडके 

भात खाववेना खूपच खडे

भाजी शिजेना ओली लाकडे 

नाचता येईना अंगण वाकडे !


वाचता येईना अक्षर छोटे 

लिहिता येईना पेन तुटके

स्पेलिंग येईना शब्दच खटके

नाचता येईना अंगण वाकडे !


गाता येईना घसाच बसला 

वाजवता येईना बोटच सुजे

साथ मिळेना तबलजी रुसे

नाचता येईना अंगण वाकडे  !



ड्रॉईंग येईना शिसेच तुटे 

पेंटिंग येईना रंगच किती फिके 

फॅशन येईना कपडे तोकडे

नाचता येईना अंगण वाकडे !


❤️💛💚

प्रोफेसर

No comments:

Post a Comment