Wednesday, 2 December 2020

संसार सुखाचा

 करू संसार सुखाचा

तिच्या न त्याच्या आवडी कधी च जुळत नाहीत

हातात हात घालून फिरायला त्याला आवडत नाही 

रस्त्याने चालताना भरभर चालणे तिला जमत नाही!

हॉटेलातले पंजाबी जेवण त्याला आवडत नाही 

अन तिथे जावून भाजी-भाकरी खाणे  तिला रुचत नाही!

मित्र मैत्रीणीना गोळा करणे त्याच्या स्वभावातच नाही 

मित्र मैत्रीणीना न भेटता तिला राहवत नाही!

सणावारी गोडधोड करण्याचा तिचा अट्टाहास,

सुट्टी म्हणून बाहेर फिरायची त्याला आस!

तिला बघायचा असतो सिनेमा, त्याला आवडे नाटक...

नाटकाचे तिकीट काढतांना  मागची सीट त्याला चालत नाही 

नाटक पाहताना सीटवरून कटकट तिला टाळता येत नाही!

 तिला स्वच्छता साफसफाई केल्याशिवाय राहवत नाही 

घरभर पसारा केल्याखेरीज त्याला चैन पडत नाही!

खरेदीला निघाल्यावर दहा दुकाने फिरणे त्याला खपत नाही 

एकाच दुकानातून  ते ही पटपट खरेदी तिला जमत नाही!

तिची होणारी घुसमट त्याला कळत नाही 

त्याचे होणारे हाल- दगदग  तिला समजत नाही!.

 वेगवेगळे स्वभाव बनवल्याखेरीज निर्मात्याला चैन पडत नाही 

आणि विरुद्ध स्वभाव एकत्र आणल्याशिवाय त्याला  मजा वाटत नाही!

तरी संसार हा दोघांचा आहे तो सुखाने  निभावल्याशिवाय ते रहात नाहीत 

आणि सुखी संसाराचे चित्र दाखवायला विसरत नाहीत .....!

अर्चना कुलकर्णी....

No comments:

Post a Comment