Wednesday, 9 December 2020

अभंग.. ज्ञानेश्वर

 सुधाकरी अभंग 🙏

निवृत्ती, ज्ञानेश

सोपान, मुक्ताई!

विठू, रखुमाई

पाही मोदे!


ज्ञानाचा सागर

केला ज्यांनी मुक्त

होती तेच भक्त

विठ्ठलाचे!


लोकांमुखी गीता

यावी ती  सांप्रत

कष्ट अविरत

ज्ञानेशाचे!


तिमिर हरोनी,

लावी दीपज्योत 

आनंद विश्वात

मागतसे!


वंदूनी गुरूला

ज्ञाना झाला तृप्त

होऊ पाहे मुक्त

समाधीस्थ!


पसायदाने देई

प्रार्थना सुखाची

विश्वाच्या मैत्रीची

ज्ञानेश्वरी!



अर्चना.कुलकर्णी


 

No comments:

Post a Comment