नाचता येईना अंगण वाकडे.....
वधू परीक्षेला सासऱ्यांनी भावी सुनेला विचारले, तुझा छंद कोणता?
गाता, नाचता तर येत नाही, मग काय सांगावे? पटकन सुचले आणि म्हणाली *वाचन*....
अरे वाह छान, कोणते करतेस वाचन..
कोणतेही, जे मिळेल ते,
बर मग आवडीचे लेखक कोण?
अं अं.... इतक्यात नोकरीमुळे नाही जमले...
बरं बरं...
आता काय करतेस नोकरीव्यतिरिक्त?
मला झाडें लावायची आहेत, पण कुठे जागा च नाहीये....
स्वयंपाक करतेस का?
करायचा असतो पण सकाळी मी उठणायापूर्वी आई करून ठेवते आणि संध्याकाळी घरी येण्यापूर्वी कामवाली सारे करून जाते....
रविवारी?
आठवडाभर कामाने थकते,
तो तर आरामाचा दिवस.. संध्याकाळी बाहेरच जाते फिरायला... बहुधा भरपेट खाऊन च येते....
करायचे आहे खूप काही
पण वेळ च मिळत नाही...
नाचता येईना अंगण वाकडे, अन रांधता येईना ओली लाकडे असे च आहे की तुझे.... सासरे वदले..
अर्चना कुलकर्णी.
No comments:
Post a Comment