तुला न कळले, मला न कळले
पहाताच तुला, भान हरपले
गोड गोजिरे, सान सोनुले
गोल डोळे, हळूच फिरवे
लगेच अशी, कशी गुंतले?
घरी नवं नको हे विसरले
अलगद उचलून तुला प्रेमाने
नाते जन्माचे बांधून घेतले!
(आम्ही कुत्र्याचे पिल्लू आणायला गेलो, तेव्हा माझा खूप विरोध होता पण तो छोटा जीव पाहून मी विरघळले... आज तर तो माझा सर्वात प्रिय आहे )
अर्चना कुलकर्णी
No comments:
Post a Comment