तुला न कळले, मला न कळले...(पादाकुलक वृत्त )
तुला न कळले, मला न कळले
पाहुनी तुला, भान हरपले!
गोड गोजिरे, सान सोनुले
घारे डोळे, हळूच फिरवे!
लगेचच अशी, कशी गुंतले?
माझा नकार मी च विसरले!
उचलता तुला प्रेम दाटले
अबोल भाषा तुला समजली
आनंदे तुला कुशीत धरले
नातं जन्माचे जुळून आले !
(आम्ही कुत्र्याचे पिल्लू आणायला गेलो, तेव्हा माझा खूप विरोध होता पण तो छोटा जीव पाहून मी विरघळले... आज तर तो माझा सर्वात प्रिय आहे )
अर्चना कुलकर्णी.
No comments:
Post a Comment