मनात जे येते ते लिहिते त्यात कुठला प्रकार आहे ते हि मला माहित नाही
प्रियावीण उदास वाटे रात
रात आहे कोजागिरीची
पण आज ती विरहाची
वाट पाहे मी साजणाची !
सांगायचं आहे खूप काही
परि आज जवळी तू नाही
सतत आठव येत राही !
पिठूर चांदण्यांची असे रात
तुझी कधी मिळेल साथ?
प्रियावीण उदास वाटे रात.
अर्चना कुलकर्णी.
No comments:
Post a Comment