*दिवस*
मनात साठवून
दिवसाचा अनुभव
जड मन होतंय
कडु अन् गोड चव !
रोज च्या कर्तव्यात
रोज दिव्य अनुभव
कधी भावविवशता
देती कधी अमृतानुभव !
ठाम एका निश्चयाने
गड जीवनाचा सर
करू पार ओढीने
हाती अनुभवाची दोर !
दूर तो आशेचा तीर
कधी करोना चा घोर
कधी नाचे मन स्वैर.
वा-यावर होऊन स्वार!
घोर अंधार सारत
दिवस पाखरु उडे
नवनवे अनुभव
नवे नाते मैत्री जोडे !
अर्चना कुलकर्णी.
No comments:
Post a Comment