दिवस
दिवस करोना चे सुरु झाले,
आयुष्य झाकोळून गेले
घरात बसून जगावे
जेवणाची चूल झाली शांत
काही सुचत नाही
काय करावे?
सकाळ च नकोशी झालीय
दिवस खायला उठतो
सुरळीत आयुष्य
कोलमडू लागले,
दिवसांचे झाले महिने,
अजून कामाला कोणी बोलवत नाही,
दोन पोरं शिकायचं म्हणून
आता शिकता येत नाही,
नाही आता कसली आशा,
मनाला भीती, सण आला
काय करू पोरांना खायला?
नेहमी मिळे बोनस दिवाळीला
आज काय सांगू पोरांना,
दारू पिऊन अर्धा झालाय नवरा
दवाखान्यात मारतो चकरा !
बोलते मी तुमच्याशी
मन व्हावे मोकळे
नको मदत पैशाची
काढू हे ही दिवस
फक्त लवकर संपु दे हे सारे
माझी कामं मला मिळू दे !
(आता च माझे माझ्या ठाण्याच्या कामवालीशी बोलणे झाले, तेच लिहिले)
अर्चना कुलकर्णी.
No comments:
Post a Comment