Thursday, 29 July 2021

चारोळ्या 2021

 *दिवस हे इवल्याशा*

*पाखराप्रमाणे असतात,*

*येतात आणि भुर्रकन उडून जातात,*

*परंतु मागे ठेवतात*

*आठवणींची पिसे*

*काही काळी,काही पांढरी*

*काही मऊ,काही खरबरीत*

*आपण जमेल तेवढी उचलायची*

*व त्यांना घेऊन* 

*बनवायची एक सुंदर चटई,*

*आयुष्याच्या संध्याकाळी*

*निवांत क्षणी ...




आस लागे जीवा विठूमाऊलीची

मनातच चलते वाट पंढरीची

साथ आहे साऱ्या वारकऱ्यांची

होईल कधी पूरी  इच्छा तव दर्शनाची?


अर्चना कुलकर्णी...



No comments:

Post a Comment