दिवस नाहीत हे फिरायचे
दिवस नाहीत हे फिरायचे ,
उगाच इथे तिथे हिंडायचे......
रस्त्यात भटकत रहाणे,
वाटतं तुम्हीच शहाणे ,
कोपऱ्यावर उगाच जमायचे
दिवस नाहीत हे फिरायचे ,
उगाच इथे तिथे हिंडायचे......
लावावा नीट तो मास्क
कठीण जगण्याचा टास्क,
श्वासात ऑक्सिजन भरायचा
दिवस नाहीत हे फिरायचे ,
उगाच इथे तिथे हिंडायचे........
भोगावी फिरण्याची फळे ,
भोवताली मृत्यूचे जाळे,
स्वतःला का आजारी करायचे?
दिवस नाहीत हे फिरायचे ,
उगाच इथे तिथे हिंडायचे........
घाबरवी बाहेरची वाट,
मिटावे घट्ट ते ओठ
घरातल्या घरात चालायचे
दिवस नाहीत हे फिरायचे ,
उगाच इथे तिथे हिंडायचे........
अर्चना कुलकर्णी.....
No comments:
Post a Comment