Thursday, 23 December 2021

मन हळवे झाले.. Thunder


*शीर्षक--ऋणानुबंध* 


तुला ठेवूनी एकट्याला

गेले बाहेरगावी फिरायला 

तुझी माझी दोस्ती आगळी 

करमत नसे एकमेकाला... 


आले कामावरुनी परत

लाडीगोडी लावशी किती

दारी उभे राहून त्या समयी

मी न दिसता दाटे मनी भीती..



ग्लुको बिस्कीट दिसता 

खुश होऊनी येशी धावत

घोटाळीशी पायापाशी 

मिळे मग तुज खास दावत..


घरात सारे चिडवून म्हणती

लाडका बेटा तुच रे माझा

काहीतरी ऋणानुबंध खरा

असे थंडर तुझा नी माझा..


आज परतीच्या वाटेवर

झाले  कातर हळवे मन

कणकणात तू च दिसशी 

ठेवोत नावे‌ कितीही जन.. 


आठ दिसांनी चालले परत 

मनात दाटे तुझीच आठवण

नसशील तू शेपटी हलवित

संपले का रे सारे  आपले ऋण?

अर्चना कुलकर्णी...

22/12/2021



No comments:

Post a Comment