कोश..
आई गेली म्हणोनी
झाले मज अतीव दुःख
गेले आपल्याच कोषात
न बोलुनी साऱ्याशी
तुटू लागले सारे बंध
बिघडू लागले नातेसंबंध,
आठवले मग तिचेच बोल
कोष उपयुक्त सुरवंटाशी
ज्यातून फुलपाखरू घडे,
परि कोष मनाचा होतो एकांगी
जो सदा आपणास छळे,
दुःख म्हणोनी केला जरी कोष
दुःख च सदा ते आठवे
आठवोनि दुःखद क्षण
प्रकृती होतसे क्षीण
न होता उदास, बोलावे चार क्षण,
अत्यानंदे कोणी विणतो कोष
कौतुक करून घेणे, लागतो छंद
जमवितो काही स्तुतीपाठक
कोषा तून त्या बाहेर पडता
जीवन भासे तया अर्थहीन,
उठले मी मग दुःख सारोनी
जगण्याची नवीन दिशा ठरवूनी.....
अर्चना कुलकर्णी....
No comments:
Post a Comment