चित्रकाव्य
चौसष्ट घरांची राजा अन राणी
सोबतीला आता न उरले कोणी,
उंट, घोडे, हत्ती,चपळ शिपाई
केली साऱ्यांनीच तुंबळ लढाई,
धारातीर्थी पडे राजाचे ते सैन्य
राजा बसे घरी होऊन उदास,
अखेर राणी येई रणांगणात
अवतरे साक्षात रणरागिणी,
शत्रूची होई पळता भुई थोडी
करुनी दुसऱ्या वर चेक मेट
विजयश्री आणली तिने खेचून
वदे राजास, नको बसू उदास,
नव्या दमाने हो तयार जगण्यास!
जिद्दीने परत आणू वैभवास,
हार अन जित प्रथम असते
आपल्या मनात अन आयुष्यात!
अर्चना कुलकर्णी....
No comments:
Post a Comment