तुझ्या नकळत तुला पाहताना,
ती प्रीती काय औरच होती,
ज्या क्षणी तुझी नजर भिडली ,
जाणवलं जीवन सुंदर आहें !
सांगू तुला,माझ्या मनाचे हाल
जवळ तू येताच झालो मी बेहाल ,
तुझा तो लटका राग,
तुझे ते चोरून हसणे,
समजत नव्हते नक्की काय ते?
जाणवत होते जीवन सुंदर आहें !
पाहिले तुला खूपदा लाजताना,
पाहिले तुला मनमुराद हसताना
मोजदाद त्यांची केली च नव्हती
तुझ्या नकळत तुला पाहताना,
जाणवत होते जीवन सुंदर आहें !
ती प्रीती काही औरच होती,
कोवळ्या वयातील कोवळी नाती
न सांगता एकमेकांना कळत होती
जीवन सुंदर असण्याची ती अनुभूती होती.
अर्चना कुलकर्णी.
18/6/2020
ती प्रीती काय औरच होती,
ज्या क्षणी तुझी नजर भिडली ,
जाणवलं जीवन सुंदर आहें !
सांगू तुला,माझ्या मनाचे हाल
जवळ तू येताच झालो मी बेहाल ,
तुझा तो लटका राग,
तुझे ते चोरून हसणे,
समजत नव्हते नक्की काय ते?
जाणवत होते जीवन सुंदर आहें !
पाहिले तुला खूपदा लाजताना,
पाहिले तुला मनमुराद हसताना
मोजदाद त्यांची केली च नव्हती
तुझ्या नकळत तुला पाहताना,
जाणवत होते जीवन सुंदर आहें !
ती प्रीती काही औरच होती,
कोवळ्या वयातील कोवळी नाती
न सांगता एकमेकांना कळत होती
जीवन सुंदर असण्याची ती अनुभूती होती.
अर्चना कुलकर्णी.
18/6/2020
No comments:
Post a Comment