Friday, 19 June 2020

मी आणि पाऊस

मी आणि पाऊस 

पावसा, तुझे माझे एक वेगळच नाते 
कधी आणि कसे यावे तुलाच जाणवते 
पहिला पाऊस अगदी जोरात च यावा 
मातीचा गंध अलगद नाकात शिरावा 
घेऊन जाता थकवा, मिळे गारवा !

निघावे कधी तुला शोधायला
 होऊन सकूटीवर स्वार 
तेव्हा व्हावी हलकी हलकी बौछार !
कड्याकपाऱ्या तून बागडताना 
तूही होऊन  बेभान,घालावे थैमान 
विसरावे सारे देहभान !
भरदुपारी यावी जोरदार सर 
लगेच व्हावे सूर्यदर्शन 
पलीकडे  दिसावी मग इंद्रधनूची कोर !
संध्याकाळ असावी मात्र रिमझिमणारी
खिडकीतूनच न्याहाळणारी 
सोबत कडक चहा व भजी खाणारी !

अशी माझ्या पावसाची मौज न्यारी !

अर्चना कुलकर्णी. 
19/06/2020

No comments:

Post a Comment