Friday, 14 December 2018

चहा दिन

चहा
चहा फक्त चहा च नसतो ,
कोणी चहा घेता का विचारणे म्हणजे फक्त चहापावडर, साखर,दूध,जमले तर आले(अद्रक) घालून उकळून चहा देणे नसते.
तर ते एक विचारणे असते ,बसून माझ्याशी काही साखरेसारख्या गोड,चहा पत्ती सारख्या कडवट, आल्यासारखा मसालेदार आठवणी /प्रसंग सांगणार /ऐकणार का ?
काही अनुभव सांगून काही नवीन आशा निर्माण करणार का ?
एक कप दोघांत घेताना होईल का जवळीक निर्माण? जी गोष्ट कोणाला सांगितली नाही ती सांगण्याचा मिळेल का विश्वास ?
सांगायचे असे काही जे कोणाला आपल्या नातेवाईकांना देखील नसते सांगितलेले ,कुठून तरी उर्मी येते समोरच्याला पाहून अन आपसूक विचारले जाते चहा घेणार का ?
भंगलेले स्वप्न , त्यावर चढलेली जळमटे उडवून टाकायची असतात कधी एकत्र चहा पिता पिता !
चहाच्या ठेल्यावर तर दोन अनोळखी व्यक्ती कधी कधी इतके बोलून जातात की ते ओळखीत ही बोलले जात नाही ,अन त्या चहाच्या वाफेबरोबर त्याच्या कोंडलेल्या मनातली वाफ देखील निघून जाते ,आणि चहाने तरतरी आली असे म्हटले जाते 🙂


त्यामुळेच कोणी जर म्हटले तर चहा घेणार का ?तर अगदीच उडवून नको लावूत,
ऐका ,सांगा सुखदुःखाच्या गोष्टी !




जागतिक चहा दिनाच्या शुभेच्छा!

अर्चना कुलकर्णी
१५/१२/२०१८

No comments:

Post a Comment