मंगळागौर गाणे
अगोटा पागोटा
घालीन म्हणते पिंगोटा
अगोटा पागोटा
पार्लर मध्ये जाईन म्हणते
आयब्रो फेशीयल करिन म्हणते
अगोटा पागोटा
मॉल मध्ये जाईन म्हणते
नवीन नायरा कट घेईन म्हणते
अगोटा पागोटा
सिनेमॅक्सला जाईन म्हणते
बाईपण भारी बघीन म्हणते
अगोटा पागोटा
हॉटेल मध्ये जाईन म्हणते
चायनिझ जेवण जेवेन म्हणते
अगोटा पागोटा
दिवस माझ्या आवडीने घालवेन म्हणते
दिवस माझा सवडीचा घालवेन म्हणते
अगोटा पागोटा....
अर्चना कुलकर्णी
No comments:
Post a Comment